पंजाबात काँग्रेस आणि अकाली दलाची मुळे खिळखिळी करण्यात ‘आप’ला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पुढील निवडणुकीत नव्या स्पर्धकाला जमीन तयार करून देण्याचे कामही ‘आप’कडून आपसूक होणार...

पंजाब निवडणूक निकालाचा लोकशाही संदेश हा आहे की, पंजाबने सत्तेचा खेळ खेळू पाहणाऱ्या नेत्यांना पुरते बाहेर केले आहे. त्यात माजी मुख्यमंत्री कॅपटन अमरिंदरसिंग, मावळते मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी, मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीवरून ‘आप’ल्या आकांक्षा लपवू शकलेले नाहीत, असे नवज्योतसिंग सिद्धू आणि माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांना सपशेल पराभूत करत कोसो दूर फेकले आहे.......

श्वास गुदमरून टाकणारी व्यवस्था आणि प्रतीकं हवीत कशाला, असा प्रश्न इंग्लंडच्या ब्रिस्टॉल शहरवासियांना पडला आणि त्यांनी एडवर्ड कोल्स्टनचा सुमारे १२५ वर्षं जुना पुतळा उखडून समुद्रात बुडवला.

वंशश्रेष्ठत्वाची रग अंगात असलेल्या ब्रिटनमध्ये गुलामीची परंपरा फार जुनी आहे. ब्रिस्टॉल या शहराचा इतिहासही तेच सांगतो. ११व्या शतकापासून या शहरात गुलामांचा व्यापार चालत असे. आधी आयरिश, इंग्लिश आणि नंतर काळ्या आफ्रिकन लोकांना गुलाम बनवून या शहरात त्यांची खरेदी-विक्री करण्याचा व्यापार भरभराटीस आला. एडवर्ड कोल्स्टन या ब्रिटिश व्यापाऱ्याचं नाव आफ्रिकी गुलामांच्या व्यापारात आघाडीवर राहिलं.......